शाळेत न जाता शनिवारवाडा पाहायला गेली, वडील रागावल्याने अल्पवयीन मुलीने घर सोडले
Marathinews24.com
पुणे– शाळेला न जाता ‘ती’ मैत्रिणीसोबत शनिवार वाडा पाहण्यासाठी येथे गेली. ही बाब वडिलांना समजल्यानंतर ते रागावल्यामुळे १६ वर्षीय मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आता सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, नागरिकांना काही माहिती असल्यास सिंहगड रोड पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
विवाहबाह्य प्रेमाचा असाही सैराट, बंधनाच्याही पलीकडचे प्रेम.. सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची १६ वर्षांची मुलगी शनिवारी (दि. १२) शाळेत न जाता तिच्या मैत्रिणीसोबत शनिवार वाडा बघण्यासाठी गेली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी माहिती झाल्यानंतर त्यांनी मुलीवर राग काढला. वडिलांचा राग सहन झाल्यामुळे मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. बाहेर जाताना तिने घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर बराच वेळ झाल्यानंतरही मुलगी घरी परत आल्याने पालकांनी अपहरण झाल्याच्या संशयातून पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करत आहेत.