Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटप

बचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटप

लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर संकलन सुरू आहे. मालमत्ताधारकांना बिलांचे महिला बचत गटांच्या महिलांमार्फत घरोघरी जाऊन बिल वाटप करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांनी निवासी, बिगर निवासी औद्योगिक व इतर मालमत्ताधारकांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेट घेत बिलांचे वितरण केले आहे.

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात – सविस्तर बातमी 

मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अद्याप ज्या मालमत्ताधारकांना अजूनही ऑनलाईन अथवा घरपोच स्वरूपात बिल प्राप्त झाले नसेल, त्यांनी कर संकलन विभागाशी संपर्क करून बिल प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

थकबाकीदारांना बिलासोबतच दिली जात आहे जप्तीपूर्व नोटीस

थकबाकीदार मालमात्ताधारकांना प्रत्येक वितरित बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस देखील दिली जात आहे. आतापर्यंत ३२ हजार ५०० थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली असून त्यांनी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मालमत्ताधारकांना बिल वाटप करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरावा. ही प्रक्रिया केवळ महसूल वाढवण्यासाठी नाही, तर शहराच्या विकासासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेत कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडत कर लवकरात लवकर भरावा. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ३१ मे २०२५ पर्यंत शंभर टक्के मालमत्ता कर बिलांचे वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सर्व मालमत्ताधारकांनी तातडीने ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने कर भरणे आवश्यक आहे. अन्यथा, मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. जर अजूनही तुमचे मालमत्ता कर बिल प्राप्त झाले नसेल, तर तुमच्या परिसरातील कर संकलन विभागीय कार्यालयाशी संपर्क करुन बिल प्राप्त करुन घेण्यात यावे. – अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×