ज्‍येष्‍ठ नागरिकाची जागा बळकावण्‍याचा प्रयत्‍न

चौघांवर गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील गुलटेकडी परिसरातील ज्‍येष्‍ठ नागरिकाचा बंगला व जागा बेकायदेशीरपणे बळकावण्‍याच्‍या उद्देशाने जेसीबीच्‍या साह्याने संरक्षक भिंत तोडण्‍याचा प्रयत्‍न शुक्रवारी ( दि.३१) केला. याप्रकरणी स्‍वारगेट पोलिसांनी कंत्राटदारासह चार जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, टीएमव्‍ही कॉलनी, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; २४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

स्‍वारगेट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी देवेश जैन (वय ३६, रा. मार्केट यार्ड) कंत्राटदार संजय लक्ष्‍मण कुदळे (रा. दांडेकर पूल), जयेश फुलपगार (वय ५४, रा. पुणे) व अनोळखी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी जेष्ठ नागरिकाच्या बंगल्‍याची जागा बळकावण्‍याचा प्रयत्‍न केला. त्यांनी फिर्यादीच्या बंगल्‍याची संरक्षक भिंत व लोखंडी गेट तोडले. पोलिस ठाण्‍याला याबाबत माहिती मिळताच गुन्‍हे निरीक्षक विकास भारमळ, उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी घटनास्‍थळी भेट दिली.

उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले की, आरोळे यांनी त्‍यांचा ४ हजार चौरस फुटाच्‍या बंगल्‍याच्‍या विक्रीचा व्‍यवहार देवेश जैन यांचे वडील डॉ. रवींद्र जैन यांच्‍यासोबत केला आहे. तो बंगला ९ कोटी रुपयांना विक्रीचा व्‍यवहार झाला असून त्‍याबाबत महसूल विभागाकडेही नोंद झाली आहे. मात्र, फिर्यादी हे तीन महिन्‍यानंतरही तो बंगला सोडायला तयार नव्‍हते म्‍हणून देवेश जैन त्‍यांचे व्‍यवसाय पार्टनर फुलपगार यांनी कंत्राटदार कुदळे यांना हा बंगला पाडण्‍याचे काम दिले होते. परंतु, बेकायदेशीरपणे ताबा घेण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यामुळे हा गुन्‍हा दाखल केला आहे. दरम्‍यान, याबाबत देवेश जैन यांनीही जागा ताब्‍यात मिळावी यासाठी न्‍यायालयात अर्ज केला आहे. आरोपी हे पाडलेली भिंत बांधून देणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×