Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे ‘रन फॉर युनिटी’ कार्यकम संपन्न

पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

बारामती – लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विदयमाने राष्ट्रीय एकता दिवसाअंतर्गत ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम तिरंगा सर्कल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.

देशाच्या विकासाची अग्रेसर महाराष्ट्राची परंपरा अधिक बळकट करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वैभव नायाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बऱ्हाणपूर पोलीस उप मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक मधूकर भट्टे तालुका किडा अधिकारी महेश चावले आदी उपस्थित होते.

कार्यकमाची सुरूवात पोलीस वॅन्ड पथक पुणे ग्रामीण दलाच्या वाद्य वाजवून करण्यात आली. राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. एकता दौडमध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

या कार्यकमात बारामती शहर व परिसरातील नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थी, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंदातील विद्यार्थी व पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अमंलदार असे सुमारे बाराशेहून अधिक नागरिकानी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×