पुणे पोलिसांची उत्तम कामगिरी; गुजरातच्या व्यापार्याची रिक्षात विसरलेली रोकडची बॅग परत केली
Marathinews24.com
पुणे – गुजरातहून पुण्यात आलेल्या व्यापार्यांच्या मदतीला पुणे पोलिस धावल्यामुळे त्यांची रोकडची बॅग जशीच्या तशी मिळण्यास मदत झाली आहे. रिक्षाप्रवासात विसरलेली रोकडची बॅग मिळवून देण्यासाठी समर्थ पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे संबंधित व्यापार्याचे १ लाख १८ हजार रूपये, टॅब माघारी मिळाला आहे. पोलिसांच्या प्रामाणिक कामाचे व्यापार्यांनी कौतुक करीत आभार मानले आहेत.
साडीच्या व्यापारासाठी गुजरातमधील व्यापारी तुळशीभाई कलाठिया (४१, रा. कतारगाम, सुरत, गुजरात) हे त्यांचे दोन व्यापारी मित्र पिरा राम कलबी आणि अरूण कुमार दुबे (दोघे रा. सुरत) यांच्यासोबत पुण्यात आले होते. लक्ष्मी रोडवरून ते रिक्षाने प्रवास करीत समर्थ ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलवर मुक्कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची रोकडची बॅग बॅग रिक्षातच विसरली. बॅगेत १ लाख १८ हजारांची रोकड आणि टॅब होता. व्यापार्याने याप्रकरणी तातडीने समर्थ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तत्परतेने सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चालकाची माहिती मिळविली. सीसीटीव्ही फुटेजनुसार रिक्षा चालकाचा क्रंमाक मिळवून त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेत रोकड असलेली बॅग परत माघारी मिळवून दिली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तुळशीभाई कलाठिया आणि त्यांच्या मित्रांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.
वाद मिटवायला गेलेल्यावर हल्ला; तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार – सविस्तर बातमी
सीसीटीव्ही फुटेजनुसार रिक्षाचालकाचा घेतला शोध
साडीच्या व्यापारी रविवारी (दि. १३) पुण्यात आले होते. संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास तिघांनी लक्ष्मी रोडवरून निवडुंगा विठोबा मंदीरासमोरील हॉटेलच्या दिशेने रिक्षाप्रवास केला. त्यावेळी तुळशीभाई यांची पैसे आणि टॅब बॅग रिक्षातच विसरली. सोमवारी (दि. १४) सकाळी त्यांना बॅग विसरल्याचे लक्षात आले. तक्रार प्राप्त होताच समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई शरद घोरपडे यांनी अरुणा चौकासह पालखी विठोबा मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. रिक्षा क्रमांक एमएच १२ क्युआर ५२२० प्राप्त करीत रिक्षा चालक सुलतान अमीर शेख (वय ४५, रा. कॅम्प, पुणे) यांचा शोध घेतला.
रिक्षाप्रवासात पैशांची बॅग आणि टॅबची विसरल्याची तक्रार व्यापार्याने दाखल केली. त्याअनुषंगाने आमच्या अमलदारांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचालकाचा क्रमांक मिळविला. त्याचा शोध घेउन व्यापार्यांची संपुर्ण रक्कम, टॅब असलेली बॅग परत मिळवून दिली आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे