Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

सराइतांकडून पिस्तुलासह काडतूस जप्त

सराइतांकडून पिस्तुलासह काडतूस जप्त

नीलायम चित्रपटगृह परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. नीलायम चित्रपटगृह परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराइतांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.चैतन्य संतोष बैरागी (वय २३, रा. लक्ष्मीनगर, पर्वती), ऋषीकेश फुलचंद रवेलिया (वय २२, रा. साठे वस्ती, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सोकावलेले बिबटे मानववस्तीत स्थिरावले… – सविस्तर बातमी 

बैरागी याच्या विरुद्ध फरासखाना आणि पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी रवेलिया याच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. बैरागी आणि रवेलिया हे नीलायम चित्रपटगृह परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.

त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. आरोपींनी पिस्तूल कोणाकडून आाणले, तसेच का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, अमोल राऊत, रवींद्र राेकडे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, पवन भोसले, प्रशांत शिंदे, गणेश खरात यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×