Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

कुख्यात नीलेश घायवळची संपत्तीची तपासा

बीड पंचायत समितीमध्ये राडा

पुणे पोलिसांचे इडी कार्यालयाला पत्र

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने खंडणी, अपहरण, खूनाचा प्रयत्न, ताबामारी, जमीनीचे गैरव्यवहार करीत कोट्यावधी रूपयांची माया गोळी केली आहे. त्याच्याविरूद्ध पुणे पोलिसांनी आतापर्यंत ११ गुन्हे दाखल केले आहेत. सध्या घायवळ परदेशात वास्तव्याला असून, त्याच्या संपुर्ण संपत्तीची तपासणी करावी, असे पत्र पुणे पोलिसांनी इडी (अमलबजावणी संचालनालय ) कार्यालयाला पाठविले आहे. त्यामुळे घायवळचा पाय आणखी खोलात गेला आहे.

हॉटेलमध्ये नव्हे थेट शेतात हुक्काबार पार्टी – सविस्तर बातमी

गुंड नीलेश घायवळ याच्याविरूद्ध अनेक गंभीर गुन्ह्यात पुणे पोलिसांना पाहिजे आरोपी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून परदेशात पलायन केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत पोलिसांनी त्याच्याविरूद्ध तब्बल ११ गुन्हे दाखल केले आहेत. खंडणी, गुन्हेगारीवृत्ती, फसवणूक यासंदर्भात त्याच्यासह टोळीचा सहभाग असून, त्याअनुषंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आता इडी कार्यालयानेही गुंड घायवळच्या संपत्तीची तपासणी करावी, असे पत्र पुणे पोलिसांनी अमलबजावणी संचालनालयास पाठवले आहे.

राज्यातील धाराशिव, अहिल्यानगर, बीड, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागात गुंड घायवळने दहशत निर्माण केली. त्यानंतर टोळीच्या मदतीने त्याने जमिनी बळकावण्यासह अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्याद्वारे त्याने कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली आहे. त्याने गैरमार्गाने संपत्ती कमवली असून, त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे इडी कार्यालयाने गुंड घायवळ याच्या संपत्तीची चौकशी करावी. दरम्यान, घायवळने जमा केलेली संपत्तीचा वापर मनी लॉड्रींगसाठी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे इडी कार्यालयाने घायवळची सर्व संपत्ती तपासणी करावी, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×