Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

किरकोळ वादातून ज्येष्ठावर शस्त्राने वार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लष्कर भागात दहशत माजविणारा गजाआड

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून दहशत माजवून ज्येष्ठाने शस्त्राने वार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. लष्कर भागातील सोलापूर बाजार परिसरात ही घटना घडली.
आरोकस्वामी व्हिन्सेंट व्यागुलदास (वय ५९, रा. सोलापूर बाजार, लष्कर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहित जाधव याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेला साथीदार सोनू शिरसवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यागुलदास यांनी याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भरधाव मोटारीची ६ वाहनांना धडक; ३ जम जखमी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यागुलदास हे ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मित्राच्या मुलासोबत बोलत होते. त्यावेळी आरोपी जाधव आणि साथीदार तेथे आले. चेतन बिडलान याच्याशी का बोलला ? अशी विचारणा केली. आरोपी शिरसवालने व्यागुलदास यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांकडे तक्रार दिली, तर जीवे मारु, अशी धमकी दिली. आरोपींनी शस्त्र उगारून दहशत माजविली. पसार झालेला आरोपी जाधव याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×