Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

भरधाव मोटारीची ६ वाहनांना धडक; ३ जन जखमी

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

हांडेवाडीतील श्रीराम चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटार चालकाने ६ वाहनांना धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. अपघातात तिघे जण जखमी झाले अशून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटार चालक प्रशांत रमेश पाटील (वय ४५, रा. ससाणेनगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध रात्री उशीरा काळेपडळ गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार चालक पाटील याने मद्यप्राशन केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बोपोडीतील जमीन घोटाळ्यात तेजवाणी, अमेडिया कंपनीचा संबंध नाही- पुणे पोलीस – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक पाटील सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भरधाव वेगात हडपसरमधील हांडेवाडी परिसरातून निघाला होता. श्रीराम चौकात मोटार चालक पाटीलचे नियंत्रण सुटल्याने त्याने एकापाठोपाठ ६ वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले असून, माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटार चालक पाटीलला ताब्यात घेतले. तसेच जखमी झालेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मोटार चालक पाटील याच्याविरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर काही काळ श्रीराम चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×