Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

जांभुळवाडीतील तलावात बुडून शाळकरी मुलगा ठार

अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून मृतदेह काढला बाहेर

marathinews24.com

पुणे – शहरानजीक जांभूळवाडीतील तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बादल शब्बीर शेख (वय १३, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी

आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी येथील तलावात एक मुलगा बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राचे उप अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, जवान अनिकेत पवार, अविनाश जाधव, प्रतिक शिर्के, विनायक घागरे यांनी जांभूळवाडी तलाव परिरात शोधमोहीम राबविली. पाण्यात बुडालेल्या शेख याला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

डेक्कन नदीपात्रात महिलेचा मृतदेह

मुठा नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरात मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख पटली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×