ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

ट्रक चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी केला गुन्हा

marathinews24.com

पुणे – रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रंजीत छोटन मिश्रा (वय ३५, रा. बालाजीनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अशोक माने यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीएमपी प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रंजीत मिश्रा शनिवारी (१५ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोेली परिसरातून निघाला होता. कटकेवाडीजवळ असलेल्या परफेक्ट वजनकाट्याजवळ लोखंडी साहित्य घेऊन निघालेला ट्रक थांबला होता. रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते. त्यामुळे अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही.

दुचाकीस्वार मिश्रा ट्रकवर पाठीमागून आदळला. अपघातात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुचाकीस्वार मिश्राला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दुचाकीस्वाराच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×