जादा परताव्याचे आमिष दाखवून २२ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २१ लाख ७६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना ८ जुलै ते ६ नोव्हेंबर कालावधीत दत्तवाडीत घडली आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकासह बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजाची विक्री, दोघांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दत्तवाडीत राहायला असून, ८ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना व्हॉटसअ‍ॅप गु्रपमध्ये अ‍ॅड करून घेत शेअर ट्रेडींगबाबत माहिती दिली. शेअर, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल २१ लाख ७६ हजार रूपये गुंतवणूक केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना आणखी रकमेची गुंतवणूूक करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

हडपसर, बिबवेवाडीत जेष्ठानाही फसवले

साबयर चोरट्यांनी हडपसरमध्ये राहणार्‍या ६२ वर्षीय जेष्ठाला टेलीग्रामद्वारे लिंक पाठवून शेअर बाजाराची माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादित करून गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अवघ्या चार महिन्यांत तक्रारदाराने २० लाख २५ हजार रूपये गुंतवले. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत. तसेच दुसर्‍या घटनेत बिबवेवाडीत राहणार्‍या जेष्ठाला सायबर चोरट्यांनी १० लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×