Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

नायलॉन मांजाची विक्री, दोघांना अटक

मुंढवा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – राज्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९ हजारांचे मोनो फिलगोल्ड कंपनीच्या मांजाचे रिल जप्त केले आहेत. आयुष राहूल शिंदे (वय २० रा. हडपसर) आणि यशराज विजय दिवेकर (वय २० रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात दोघेजण बेकायदेशिररित्या नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार शिवाजी जाधव आणि योगेश राउत यांना मिळाली.

बारामती नगरपरिषद निवडणुकीत आचार संहिता भंग; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी छापा टाकून आयुष, विजय यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ९ हजारांचे मांजाचे रिल जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, एपीआय राजू महानोर, उपनिरीक्षक युवराज पोमण, राहूल धोत्रे, शिवाजी धांडे, राहूल मोरे, योगेश गायकवाड, रूपेश तोडेकर, स्वप्नील रासकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×