Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बारामती नगरपरिषद निवडणुकीत आचार संहिता भंग; गुन्हा दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांची माहिती

marathinews24.com

बारामती – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दरम्यान आचारसंहिता भंग आणि निवडणूक विषयक कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे. अभिजीत कांबळे ( रा. आमराई, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आचारसंहिता पथक प्रमुख तथा अग्निशमन अधिकारी पदमनाभ सुधीर कुल्लरवर यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ललिता सबनीस यांच्या साहित्यकृतीतून मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन – प्रा. मिलिंद जोशी – सविस्तर बातमी

निवडणुकीकरीता बारामती नगरपरिषद नवीन इमारत, दुसरा मजला निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या 17 नाव्हेंबरला विविध उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना पत्रकार म्हणून अभिजीत कांबळे याने दुपारी अडीच वाजेदरम्यान कोणतीही पुर्वपरवानगी न घेता निवडणूक प्रक्रियेची गुप्तपणे चित्रीकरण केले. ते चित्रीकरण स्वत:च्या फेसबुक समाज माध्यमावर 19 नोव्हेंबरला प्रसारित केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात बेकायदेशीरपणे जमाव करुन गोंधळाची स्थिती निर्माण केली.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी उद्धटपणे वर्तन केले, नामाकंन प्रकियेमध्ये अडथळा निर्माण करुन गोपनीयतेचा भंग केला. उमेदवाराच्या नामाकंन पत्राची छाननी प्रकिया सुरु असतांना 18 नोव्हेंबरला अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी कांबळे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132,192,174,175,223 तसेच लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 128,125,127(ए), 129 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66 (अ), 66 (सी), 66 (ड) आणि 67 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×