Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

जिथं माजवली दहशत, तिथेच पोलिसांनी काढली टोळीची धिंड

सराईत आंदेकर टोळीला नाना पेठ, गणेश पेठेत फिरविले

marathinews24.com

पुणे – गृहकलहासह टोळीतून कुख्यात बंडु आंदेकर टोळी आणि गायकवाड टोळीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात एकमेकांचा बदला घेण्याचे सत्र कायम आहे. नुकत्याच आंदेकर टोळीने केलेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर समर्थ पोलिसांनी टोळीची धिंड काढली. त्यांची दहशत असलेल्या नाना पेठेसह गणेश पेठेत टोळीला फिरवण्यात आले. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी पोलिसांनी घरझडतीचे निमित्ताने गुंडांची परिसरातून धिंड काढली.

महिलेशी संबंध असल्याचा संशयातून चुलत भावाचा केला खून – सविस्तर बातमी

मुलगा वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा सप्टेंबरमध्ये खून केला आहे. त्यानंतर दोन्ही टोळ्यात वाद विकोपाला गेला असून, प्रतिहल्ले केले जात आहेत. दरम्यान, आयुष कोमकर हत्येतील आरोपी कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांच्या घराची पोलिसांकडून झडती घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर तिन्हीही आरोपींना पोलिसांनी नाना पेठ, गणेश पेठ परिसरात फिरविले. यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. दरम्यान, आयुष कोमकर खुन प्रकरणात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×