Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुणे पोलिसांनी १७१ मोबाइल दिले मिळवून

परिमंडळ पाचच्या कर्मचारी-अधिकार्‍यांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात कामानिमित्त फिरताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल १७१ महागडे मोबाईल पुन्हा तक्रारदारांना मिळवून देण्यात पोलिसांनी बाजी मारली आहे. परिमंडळ पाचने नागरीकांना मोबाइल मिळवून देत त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले आहे. हडपसर, लोणी-काळभोर, मुंढवा, फुरसुंगी, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, काळेपडळ पोलीस ठाण्यातंर्गत गहाळ मोबाइल संबंधितांना मिळवून दिले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, एसीपी नम्रता देसाई यांच्या उपस्थितीत हडपसरमधील कार्यालयात मोबाइल वितरित केले.

घरफोडी करणार्‍या सराईताला अटक; बाणेर पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

मोबाइल हरविल्यानंतर नागरिकांनी ऑनलाइनरित्या तक्रार केली होती. यासंदर्भात नागरिकांनी पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड पोर्टलवर तक्रारींची ऑनलाइन नोंद केली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांकडून मोबाइलची माहिती काढण्यात आली. संबंधित वापरकर्त्यांसह मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार केला. त्याद्वारे गहाळ झालेले १७१ मोबाईल विविध भागांत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल वापरकर्त्याना संपर्क करून मोबाईल जमा केले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत.

हडपसर-११९, लोणी काळभोर-८, मुंढवा-४, फुरसुंगी-१, वानवडी-३, कोंढवा-२१, बिबवेवाडी-१, मार्केटयार्ड-६, काळेपडळ- ८ असे मिळून १७१ मोबाइल पोलिसांनी शोधून काढले आहेत. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २१) आयोजित कार्यक्रमात नागरिकांना मोबाईल सुपुर्द केले.

संबंधित सर्व ठाण्यातील अधिकार्‍यांनी मोबाईल कंपनीला पाठपुरावा करीत लाखो रूपयांचे मोबाईल परत मिळवले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, वरिष्ठ निरीक्षक अश्विनी सातपुते उपस्थित होते.

मोबाइल हरवल्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ पाचच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि मोबाईल कँपन्यांना पाठपुरावा करून १७१ मोबाईल ते मोबाईल मुळ मालकांना मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. – डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×