पत्नीसोबत अनैतिक संबंध, रागातून चुलतभावाचा केला खून

मृतदेह पोत्यात भरून टाकून दिला

marathinews24.com

पुणे – पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गळा चिरून चुलत भावाचा खून केल्याची घटना गुजरवाडीत घडली. त्यानंतर संंबंधिताने पोत्यात भरून मृतदेह डोंंगरात नेउन फेकला होता. याप्रकरणात मिसींगच्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी शोधमोहिम राबवून ३६ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजयकुमार गणेश पंडित (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. अशोक पंडित (वय ३५, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १७ नोव्हेंबरला घडली आहे.

ओतूर परिसरातील सात वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंडित आणि अशोक पंडीत दोघेही झारखंडचे असून मागील चार वर्षांपासून पुण्यात काम करीत आहेत. अजय हा खोपडेनगरमध्ये लेबर कॅम्पमध्ये राहत असताना बेपत्ता झाल्याची तक्रार विजय कुमार याने भारती विद्यापीठ पोलिसांकडे नोंदविली होती. हा घातपाताचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून आरोपी अशोक पंडीत याचे अजयसोबत वाद झाल्याची माहिती पोलीस अमलदार अभी चौधरी, मितेश चोरमोले यांना मिळाली. पोलीस अमलदार सागर बोरगे यांनी तांत्रिक विश्लेषद्वारे आरोपी अशोकची माहिती काढली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अमलदार संदीप आगळे, तुकाराम सुतार यांनी पिंपरीतून अशोकला ताब्यात घेतले. पोलीस चौकशी केल्यावर त्याने अजयचे माझ्या पत्नीसोबत संबंध होते. त्याच रागातून १७ नोव्हेंबरला त्याचा गळा चिरून खून करीत मृतदेह फेकून दिल्याची कबुली अशोकने दिली. त्यानंतर पोलिसांनी अजय पंडितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, एपीआय समीर शेंडे, स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, मंगेश पवार, दीपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, अभिनय चौधरी, नीलेश खैरमोडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×