Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

बंडगार्डन रस्त्यावरील सराफी पेढीत चोरी

महिलांकडून ५ लाखांचे दागिने चोरीला

marathinews24.com

पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दागिने चोरून नेल्याची घटना बंडगार्डन रस्ता, तसेच कोंढवा भागात घडल्या. याप्रकरणी कोेरेगाव पार्क आणि कोढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले.

ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी; दीड लाखांची सोनसाखळी लंपास – सविस्तर बातमी

बंडगार्डन स्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आले. याबाबत सराफी पेढीतील रोखपालाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी बुरखा परिधान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर एका प्रसिद्ध सराफी पेढीत १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. महिलांनी सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतविले. दागिने खरेदीचा बहाणा करुन महिलांनी चार लाख ७४ हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले.

कडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नुकतीच पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सराफी पेढीतील चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करत आहेत.

कोंढवा भागातील एका सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी २० हजार रुपयांची सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोंढवा खुद्र भागात विठ्ठल मंदिराजवळ सराफी पेढी आहे. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरल्या. महिलांनी सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून २० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. पसार झालेल्या महिलांंनी बुरखा परिधान केल्याचे सराफ व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×