Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुणे पोलिसांचे ऑपरेशन उमरटी यशस्वी

शस्त्र बनवणार्‍या ५० भट्टया उध्वस्त, ३६ जण ताब्यात

marathinews24.com

पुणे – अवैध शस्त्रविक्रीचे कंबरडे मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील उमरटीमध्ये ऑपरेशन राबविले. तब्बल १०५ अधिकारी-कर्मचार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारून तब्बल ५० शस्त्र बनवणार्‍या भट्टया उध्वस्त केल्या. तसेच २१ पिस्तूले जप्त करीत ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्याठिकाणावरील आंतरराज्यीय अवैध शस्त्रास्त्र पुरवठा केंद्र उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे उपस्थित होते.

सायबर चोरट्यांनी पुणेकरांना घेरले – सविस्तर बातमी

विमानतळ पोलिसांनी काही दिवसांपुर्वी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनवेळी ११ पिस्तूले जप्त केली होती. तसेच काळेपडळ पोलिसांनी ४ तर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ६ पिस्तूले जप्त केली होती. संबंधित आरोपींकडे चौेकशी केल्यानंतर त्यांनी पिस्तूलांची खरेदी मध्यप्रदेशातील उमरटीतून केल्याचे स्पष्ट झाले. त्याठिकाणाहून आंतरराज्यीय पिस्तूलांची तस्करी होत होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्या पथकाने मध्यप्रदेशात धाव घेतली. २२ नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास छापा टाकून ३६ जणांना ताब्यात घेतले. तसेच ५० शस्त्र बनवणार्‍या भट्टया उध्वस्त केल्या. त्यासोबतच अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रास्त्रे भरण्याचे साहित्यही जप्त केले.

कारवाईसाठी पुणे पोलिसांकडून ड्रोनसह इतर साधनांचा वापर

परराज्यात कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी तयारी केली होती. तब्बल १०५ अधिकारी-कर्मचारी, ड्रोन, शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस आणि सीसीटीव्हीसह मध्यप्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा मदतीला घेतला. तसेच मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स, बॉडी वॉर्न कॅमेरे यांचाही वापर करीत पिस्तूल बनावण्याच्या भट्टया नष्ट केल्या. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्वतः लीड करीत ऑपरेशन उमरटी प्रत्यक्षात यशस्वी केले आहे.

पिस्तूलाचा ‘यूएसए’ ब्रँड विक्रीला

अवैध शस्त्रे ‘ उमरटी शिकलगार आर्म्स (युएसए) या नावाने तयार करून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी पाठवली जात होती. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली जात असून, चौकशीनंतर शस्त्र पुरवठा साखळीचा पूर्ण उलगडा होण्यास मदत होणार आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त सोमय मुंडे, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, एपीआय नितीन नाईक, एपीआय मदन कांबळे, एपीआय कल्याणी कासोदे, पठाण, देशमुख, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.

पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील उमरटी भागात जाउन शस्त्र निर्मितीचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी जवळपास ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच शस्त्र बनवण्याच्या तब्बल ५० भट्टयाही नष्ट करण्यात आल्या आहेत. आरोपींना पुण्यात आणल्यानंतर याप्रकरणीचा आणखी उलगडा होणार आहे. – रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×