Breking News
Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पुण्याने देशाला कसलेले खेळाडू दिले – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे पुण्यात भव्य स्वागत

marathinews24.com

पुणे – तमिळनाडूमध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ च्या ट्रॉफीचे शनिवारी पुण्यात अत्यंत भव्य स्वागत करतो, “मी या ट्रॉफीसह आलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो. तसेच ही वर्ल्ड कप ट्रॉफी भारतातच राहील, अशी मी मनापासून अपेक्षा करतो. पुण्याने भारतीय हॉकीला नेहमीच गुणी दिग्गज आणि अनुभवसंपन्न खेळाडू दिले आहेत. धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव उज्ज्वल केले आहे,” असे मत राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

अभिजात भाषांचे नेतृत्व मराठीने स्वीकारावे – डॉ. किरण कुलकर्णी – सविस्तर बातमी

सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर या वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कृष्ण प्रकाश (आयपीएस) यांनी निभावले. यावेळी हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे आणि हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांनीही ट्रॉफीचे स्वागत केले. याशिवाय विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस (प्राचार्य – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, पुणे), सिस्टर लैला (प्राचार्या – सेंट एन्स हायस्कूल उपस्थित होते.

राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “पिल्ले परिवाराने जागतिक पातळीवर अनेक विक्रम नोंदवले आहेत. हॉकी क्षेत्रात पुण्याचे योगदान अतिशय मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातून आणखी धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांच्यासारखे खेळाडू निर्माण होतील, अशी माझी अपेक्षा आहे. आज पुण्यातील दहा खेळाडू राष्ट्रीय निवड शिबिरात सहभागी आहेत, ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यातील खेळाडूंना आवश्यक ती मदत राज्य शासन आणि महाराष्ट्र संघटना नक्कीच देईल.”

आयपीएस कृष्ण प्रकाश म्हणाले, “हॉकी ट्रॉफी टूरचा मुख्य उद्देश राष्ट्रीय खेळाचा प्रसार करणे आणि मेजर ध्यानचंद यांसारख्या महान खेळाडूंना आदरांजली वाहणे हा आहे. निरोगी शरीरातूनच निरोगी मनाची निर्मिती होते. म्हणून हॉकी हा केवळ खेळ नसून ध्यान, शिस्त आणि व्यायाम यांचा सुंदर संगम आहे. नेल्सन मंडेला यांनी खेळाच्या माध्यमातून पंथ, भाषा आणि वर्णभेद दूर करून राष्ट्राला एकत्र आणले. भारताची युवा शक्ती अपार आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी पदके जिंकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

कार्यक्रमात विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस आणि सिस्टर लैला यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

पुण्यातून ट्रॉफी हैदराबादकडे रवाना

ट्रॉफी टूरची सुरुवात लोहेगाव येथील संत तुकाराम हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. येथे तीन शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यानंतर ट्रॉफीचा काफिला खडकीतील एक्सेलसियर थिएटर चौकात दाखल झाला. येथून रॅली निघाली आणि राजघरना, सलाम जनरल स्टोअर, गांधी चौक मार्ग ओलांडत ती कर्नल भगत हायस्कूल येथे पोहोचली. रॅलीत स्थानिक युवक, प्रशिक्षक व ज्येष्ठ हॉकीपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले. ट्रॉफीला सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर आणण्यात आले, जिथे भव्य स्वागत सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर ही ट्रॉफी पुढील प्रवासासाठी पुण्यातून हैदराबादकडे रवाना झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×