Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पुण्यात बिबट्या दिसल्याची बोंबाबोंब…वनविभाग अलर्ट मोडवर

पुण्यात बिबट्या दिसल्याची बोंबाबोंब...वनविभाग अलर्ट मोडवर

औंधसह ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन; नागरिकांचा दावा

marathinews24.com

पुणे – बिबट्या पुणे शहरातील विविध भागात दिसत असल्याचे लोण पसरले आहे. याबाबत नागरिकांसह स्थानिकांकडून प्रत्यक्ष बिबट्याला पाहिले जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, औध परिसरातील आरबीआय कॉलनीसह सिंध सोसायटी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यापार्श्वभूमीवर वनविभागाकडून खबरदारी घेण्यात आली असून, संपुर्ण परिसरात ग्राउंड ट्रॅिंकंग करण्यावर भर देण्यात आला आहे.

पोलिसांच्या टीमवर्कमुळेच यशस्वी कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

औंध परिसरातील आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटी परिसरात रविवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या स्थानिकांना दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पुणे वन विभागासह रेक्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्याठिकाणी बिबट्या नागरिकांना दिसून आला, त्या संपूर्ण परिसरात ग्राउंड ट्रॅकिंग सुरू करण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी दोन्ही पथके पूर्ण सज्ज असल्याचे वन विभागाने सांगितले.

नागरिकांना सोसायटी परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच आजूबाजूच्या स्थानिक सोसायट्या व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्यानंतर पुन्हा तो कुठेही दिसून आला नाही. मात्र, तरीही वन विभाग आणि टीमकडून रात्रीही ट्रॅकिंग व मॉनिटरिंग सुरू ठेवणार आहेत. दरम्यान, पुणे विमानतळ परिसरातही बिबट्या दिसून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यापार्श्वभूमीवर त्याठिकाणीही खबरदारी घेण्यात आली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×