पोलिसांच्या टीमवर्कमुळेच यशस्वी कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलिसांच्या टीमवर्कमुळेच यशस्वी कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मध्य प्रदेशातील शस्त्राचे कारखाने उध्वस्त करणार्‍यांना सन्मान

marathinews24.com

पुणे – पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या टीम वर्कमुळेच परराज्यात जाउन शस्त्र निर्मिती कारखान्याचे जाळे उध्वस्त केले आहे. आमच्या पोलीस दलाने मर्यादासह बंधने झुगारून काम केल्यामुळे चांगले यश मिळाले आहे. कारवाईवेळी आरोपींकडून दगडफेक, गोळीबारासह प्रतिहल्ल्यास आम्ही तयार होतो. मात्र, प्लॅनिंगमुळे तशी वेळच आली नाही. त्यामुळे सर्व पोलीस अमलदार
अधिकार्‍यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिशन उमरटी ऑपरेशन पार पाडणार्‍यांचे कौतुक केले.पोलीस आयुक्तालयात आयोजित कौतुक समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त रंजकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त सोमय मुंडे, उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर उपस्थित होते.

पिस्टल बाळगणार्‍याला अटक, युनीट एकची कामगिरी – सविस्तर बातमी  

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, विमानतळ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिशय बारकाईने तपास केला. त्याद्वारे शस्त्र खरेदी-विक्रीची लिंक मिळवून मध्यप्रदेशतील उमरटी गावाचे कनेक्शन स्पष्ट झाले. त्याठिकाणी शस्त्र निर्मितीचे कारखाने उध्वस्त करण्याची आमची भूमिका होती. त्यापार्श्वभूमीवर सुरूवातीला पोलिसांनी खासगी वाहनातून संपुर्ण गावाची रेकी केली. त्यानंतर कारवाईचा रोडमॅप तयार करीत संपुर्ण टीम तयार केली. क्यूआरटी टीम, स्थानिक पोलिसांची मदत, बॉडी कॅमेरे, ड्रोन कॅमेर्‍यासह, तात्पुरते कंट्रोल रूमची उभारणी त्याचठिकाणी केली. एकाचवेळी संपुर्ण गावाला वेढा टाकून पहाटेच्या सुमारास कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आरोपींना प्रतिहल्ला करण्यास वाव मिळाला नाही. मात्र, काही प्रमाणात तेथील महिलांनी पोलिसांसोबत चुकीचे वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.

घरात घुसून कारवाई करणार

गुन्हेगार कोणत्याही ठिकाणी असला तरी, त्याच्या घरात घुसून आम्ही कारवाई करतो, असा संदेश या कारवाईतून पुणे पोलिसांनी दिला आहे. त्याठिकाणची भौगोलिक परिस्थिती, पुर्वीचे रेकॉर्ड, आरोपींना मिळणारी मदतीचा कसलाही विचार न करता पोलिसांनी पुर्ण ताकदीने आणि तयारीने उत्तर दिले आहे. त्यामुळे उमरटी गावातील शस्त्र निर्मितीचे मोठे जाळे उध्वस्त होण्यास मदत झाली. मध्यप्रदेशातील एटीएस प्रमुख साई मनोहर यांचीही मोठी मदत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच कारवाई सहभागी झालेल्या प्रत्येकाला १० हजारांची रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×