Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पिस्टल बाळगणार्‍याला अटक, युनीट एकची कामगिरी

पिस्टल, काडतुस असा ५१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्टल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल, काडतुस असा ५१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. रमजान ऊर्फ टिपु आदम पटेल ( वय ३३ रा. भाजी बाजार शिरुर, पुणे )असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मी पोलिसाचा मुलगा, अपघात करणार्‍याची दादागिरी – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेचे पथक २२ नोव्हेंबरला पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना मंगळवार पेठेत एकजण कंबरेला पिस्तूल खोचून उभा असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल मखरे यांना पथकासह मंगळवार पेठेत धाव घेतली. तेथून रमजान ऊर्फ टिपुला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी विजय कुंभार, शशीकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयुर भोसले, सिध्देश्वर वाघमारे, उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ, मयुरी जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×