मी पोलिसाचा मुलगा, अपघात करणार्‍याची दादागिरी

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

marathinews24.com

पुणे – बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणार्‍या एका तरूणाने दादागिरी करीत मी पोलिसाचा मुलगा आहे, अशाप्रकारे दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने मध्यवर्ती नारायण पेठेतील वाहनांना धडक दिल्यामुळे संबंधिताने तरूणाला अडविले. मात्र, गाडीतून खाली उतरताच त्याने घटनास्थळी असलेल्यांना मी पोलिसांचा मुलगा आहे, मला मारले आहे अशापद्धतीने अरेरावीची भाषा केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.

जादा परताव्याचे आमिष पडले २४ लाखांना – सविस्तर बातमी

भरधाव मोटार चालक तरूणाने बेदरकापणे वाहन चालवित रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. २२) रात्री उशिरा मध्यवर्ती नारायण पेठेत घडली. अपघातानंतर नागरिकांनी तरुणाला गाडीच्या खाली उतरवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो एका मैत्रिणीसोबत गाडीतून खाली उतरला असता, त्याने मद्यपान केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नशेत स्वतःला पोलिस अधिकार्‍याचा मुलगा असल्याचा धाक दाखवत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावरच्या वाद वाढत गेला. त्यानंतर गर्दी झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गोंधळामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. रस्त्यावर सुरू झालेल्या बाचाबाची आणि आवाजांच्या गोंगाटामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी मोटारीत चौघे असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये दोन तरूणींचा समावेश होता. संबंधित भरधाव मोटार चालकाने अपंग व्यक्तीलाही धडक दिल्याची माहिती उपस्थितांनी दिली. मात्र, याबाबत खातरजमा होउ शकली नाही. अपघातात सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, रस्त्यावरील वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रहिवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, विश्रामबाग पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×