Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

‘पेन्शन कार्ड’ देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची राेकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेने समाज माध्यमात ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे, अशी जाहिरात पाहिली होती. महिलेने ही जाहिरात पाहिली. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेचे बँक खाते, आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच डेबिट कार्डची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची रोकड लांबविली. खात्यातून रक्कम लांबविण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×