विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

१ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले; स्वतःच्या केबिनमध्ये घेतली लाच

marathinews24.com

पुणे – ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शिक्षण उप निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब मिरगणे (वय ५६) असे रंगेहात पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी ( दि. २५) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आरोपीच्या केबिनमध्ये करण्यात आली.

पुण्यात ५ हजारांची लाच घेणारा हवालदार अटकेत – सविस्तर बातमी 

तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कामाला आहे. त्यांना शालार्थ आयडी’ नसल्याने २०१६ पासून विना वेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी झाल्यानंतर त्यांना वेतन सुरू होणार होते. शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जूनला विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे याठिकाणी दाखल केला होता. तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी १७ नोव्हेंबरलया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे याठिकाणी तक्रार दिली तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याला स्वतः च्या केबिनमध्ये १ लाख रुपयांची लाच घेताना पकडले आहे. त्याला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×