Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात ५ हजारांची लाच घेणारा हवालदार अटकेत

पुण्यात ५ हजारांची लाच घेणारा हवालदार अटकेत

सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेणाऱ्या हवालदाराला पकडले

marathinews24.com

पुणे – मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाघोली पोलीस ठाण्यातील पाेलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी पकडले. वाघोली पोलीस ठाण्यासमोर ही कारवाई करण्यात आली. परमेश्वर माणिक पाखरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

नवले पुलावर वेग मर्यादेचे उल्लंघन – सविस्तर बातमी 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झाली आहे. तक्रारदार महिला मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. तिचा पती वाघोली भागात राहायला आहे. तिने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो मान्य करून न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली. मात्र, पतीने पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तिने सहा लाख ६५ हजारांची थकीत पोटगी मिळण्यासाठी विटा न्यायालयात मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला. न्यायालायने संबंधित अर्ज मंजूर केला.

वॉरंट बजावण्यासाठी वाघोली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. या कामाची जबाबदारी पोलीस हवालदार पाखरे याच्याकडे सोपविण्यात आली होती. पाखरे हे वॉरंट बजावत नव्हते. त्यानंतर महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात त्याची भेट घेतली. त्या वेळी हवालदार पाखरे याने हे वॉरंट बजावण्यासाठी तिच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार महिलेने ‘एसीबी’कडे तक्रार दिली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली. महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळले. पाखरे याने महिलेला मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वाघोली पोलीस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर बोलवले. तेथे सापळा लावून पाखरे याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×