Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

१ लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

marathinews24.com

पुणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनच्यावतीने केलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार खेड तालुक्यात नाणेकरवाडी हद्दीतील मुत्केवाडी या ठिकाणी अवैद्य मद्यविक्री अड्ड्यावर छापा टाकून २५ नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली.

शेअर मार्केट परताव्याचे आमिष पडले ३ लाखांना – सविस्तर बातमी

कारवाईत देशी दारू पावर लाईन पंच मद्याच्या १८० मिली व ९० मिली क्षमतेच्या एकूण ६४४ बनावट सिलबंद बाटल्या तसेच विदेशी मदयाच्या बनावट ७१ सीलबंद बाटल्या, दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा सर्व मिळून १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अहमदसाब पठाण व हरीष ब्रिजेश कुमार चंद्रा याला अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर करून आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

भरारी पथक क्रमांक तीनचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे यांच्यासह सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस डी साठे, जवान सर्वश्री अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते, वाहन चालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य, बनावट मद्य, गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×