Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

पुण्यातील व्यावसायिकाला ३ कोटी ८० लाखांचा गंडा

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

सराईताला अटक, खडक पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दुबईसह टांझानिया देशातून कमी दरात कच्चा माल (स्क्रॅप मटेरियल) हिंदुस्थानात निर्यात करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकांना कोट्यावधींचा गंडा घालणार्‍या सराईत आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली आहे. भुपेंद्र सिंग ऊर्फ संजय कुमार राघव (रा. गौतमबुध्दनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुधीर रघुनाथ बारोट( रा.२३४, न्यू रविवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई – सविस्तर बातमी

व्यावसायिक सुधीर बारोट यांचा रविवार पेठेत तव्यांची भांडी बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना कच्च्या मालाची कायम आवश्यक भासते. डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ कालावधीत त्यांची मुंबईत इंडो अर्फी मेटल्स को एलएलसी व सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपीचे मालक भुपेंद्र सिंग ऊर्फ संजय कुमार आणि त्याचा मुलगा प्रन्वीरसिंग संजय कुमार राघव यांच्यासोबत ओळख झाली होती. दोघांनीही त्यांना दुबईत ऑफिस असून, बारोट यांच्या मागणीप्रमाणे कच्चा माल पुरवठा करण्याची हमी दिली होती. आरोपींनी बारोट यांना दुबईत बोलावून घेत टांझानियात नेउन ७५ टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला होता.

मालाची निर्यात हिंदुस्थानातील मुंद्रा पोर्ट, गुजरातमध्ये करण्याचा करार करण्याचा विश्वास संपादन केला. व्यवहारापोटी सुधीर बारोटकडून ३ कोटी ८० हजार लाख रूपये अबुधावी बँक (दुबई, युएई) येथील बँक खात्यावर स्वीकारले . मात्र, त्यांना कोणताही कच्चा माल किंवा व्यवहारात स्विकारलेली रक्कम बारोट यांना दिली नाही. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी पर्वती दर्शन परिसरात राहणारे मिलींद रवींद्र नाशिकर यांचीही तब्बल ९० लाखांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, आरोपी भुपेंद्र हा पश्चिम बंगालला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

देशभरातील व्यावसायिकांना गंडा, तपासात उघडकीस

पोलिसांनी तातडीने धाव घेत भुपेंद्रला ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासामध्ये त्याने स्वतःसह मुलगा प्रन्वीरसिंग असे मिळून कलकत्ता, केरळ, उडीसा, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये अशाच पद्धतीने व्यवहार करीत कोट्यावधी रूपयांची फसवणूक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक भारत बोराडे, संतोष मोहिते, योगेश कुंभार, राजाराम गाढवे, किरण खुडे, किरण घुटे, संतोष साबळे यांनी केली.

तुमचीही फसवणूक झालीय, इथे करा संपर्क

नागरिकांनो आरोपी भुपेंद्र सिंग याच्यासह पाहिजे आरोपी प्रवीरसिंग संजय कुमार राघव यांनी अनेकांना कच्चा माल पुरविण्याच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घातला आहे. अशाच पध्दतीचा वापर करून कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांना (मो.नं. ९९२३४३६०६०) संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×