Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

येरवड्यात कपडे चोरणारी महिला अटकेत

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन महिलेचा घेतला शोध 

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पेतून कपडे चोरणाऱ्या महिलेला येरवडा पोलिसांनी अटक केली. कपडे चोरून पसार झालेल्या महिलेचा सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन माग काढण्यात आला. नंदा विकास काळे (वय ४५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, चंद्रमानगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका टेम्पो चालकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२ लाख रूपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेल – सविस्तर बातमी 

तक्रारदार टेम्पो चालक हे ऑनलाइन पद्धतीने विक्री करणाऱ्या विविध वस्तूंची वाहतूक करतात. महागड्या कपडे पोहोचविण्याचे काम टेम्पो चालाकाकडे सोपविण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी चालकाने टेम्पो येरवड्यातील प्रतीकनगर परिसरात लावला. टेम्पोत महागड्या कपड्यांचे पार्सल ठेवण्यात आले होते. काळे हिने टेम्पोत ठेवलेले कपड्यांचे पार्सल लांबविले. टेम्पो चालकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे आणि शैलेश वाबळे यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा चित्रीकरणात कपडे चोरणारी महिला आढळून आली. महिला परिसरात राहत असल्यचाी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन काळे हिला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×