पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकरमहाराज मठासमोर घटना
marathinews24.com
पुणे – पीएमपी बसच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकरमहाराज मठासमोर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस शिपाई अकिल तडवी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवड्यात वाहनांची तोडफोड करणारा गुंड अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील श्री शंकर महाराज मठासमोरील बीआरटी मार्गातून निघालेल्या एकाला पीएमपी बसने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अपघातानंतर पीएमपी बस चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.






















