गुंतवणूकीचे आमिष पडले साडेनऊ लाखांना

महिलेला कमी गुंतवणूकीवरील नफा पडला ५२ लाखांना

आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी मुंढव्यातील तरूणाला तब्बल साडेनउ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १६ जानेवारी ते १८ मार्च २०२४ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव पीएमपी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मुुंढव्यात राहायला असून, १६ जानेवारी २०२४ रोजी सायबर चोरट्याने त्याला संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यात ९ लाख ५० हजार रूपये गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×