रिक्षा प्रवासात महिलेचे दागिने चोरीला

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रिक्षा प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या पर्समधील ६१ हजार ५०० रूपंयाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १६ नोव्हेंबरला दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घोरपडी ते पुणे रेल्वे स्थानक प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी घोरपडीत राहणार्‍या ३३ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूकीचे आमिष पडले साडेनऊ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घोरपडी गावात राहायला असून, १६ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास तक्रारदार प्रवाशी रिक्षाने प्रवास करीत होती. त्यावेळी रिक्षातील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील ६१ हजारांवर रूपयांचे दागिने चोरून नेले. रिक्षातून खाली उतरून काही अंतर गेल्यानंतर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक गर्कळ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×