Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुण्यात सराईताकडून पिस्तूल जप्त

दांडेकर पूल परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराईताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त केली.
नरेंद्र महादेव बलकवडे (वय ३५, रा. मेहेंदळे गॅरेजजवळ, एरंडवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बलकवडे हा सराईत आहे.

टिळक रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग करणारा अटकेत – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी नितीन जगदाळे, तुषार किंद्रे हे दत्तवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी बलकवडे हा दत्तवाडी ते दांडेकर पूल दरम्यान असलेल्या रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून बलकवडे याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस कर्मचारी अमित बोडरे, नितीन जगदाळे, तुषार किंद्रे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×