नवी पेठेत चोरीची घटना, सव्वातीन लाखांचे दागिने लंपास
Marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती नवी पेठेतील रामबाग कॉलनीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना २१ मार्च ते १२ एप्रिल २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय तक्रारदाराने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे २१ मार्च ते १२ एप्रिल २०२५ कालावधीत परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असता, चोरट्यांनी कोणीही नसल्याची संधी साधून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सव्वा तीन लाखांचे दागिने चोरुन नेले. जेष्ठ नागरिक परदेशातून आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर तपास करीत आहेत.