पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षणासाठी फेसलेस सेवा 12 डिसेंबरपासून सुरू

नागरिकांना घरबसल्या आकर्षक नंबर बुकिंगची सुविधा

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा २१ डिसेंबर रोजी ‘संकल्प मेळावा’ – सविस्तर बातमी

ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

सदर फेसलेस सेवा कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या एमएच 12 वाय झेडे मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×