सोलापूर-धुळे महामार्गावर डिझेल टँकरला भीषण आग

सोलापूर-धुळे महामार्गावर डिझेल टँकरला भीषण आग

बीडच्या मांजरसुंबा घाटात आगीचे लोट; टँकर पलटी होऊन दुर्घटना

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – डिझेलच्या टँकरचा अपघात होऊल भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात एका शुक्रवारी ( दि.१२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत टॅंकर चालक होरपळून गंभीर जखमी झाला.त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

मांजरसुंबावरून बीडकडे जाणाऱ्या टॅंकरचा पाली जवळील घाटात टायर फुटून अपघात झाला. टँकर पलटी झाल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची त्याला धडक बसल्याने हा भयानक स्फोट झाल्याचे घटनास्थळी सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण घाट परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य पसरले होते.

मांजरसुंबा घाटातील अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने डिझेलने भरलेला टँकर पलटी झाला. पलटी झाल्यानंतर हा टँकर रस्त्यावरून काही अंतरापर्यंत घसरत गेला. यामुळे टँकरमधील डिझेल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडले. टँकरच्या पाठीमागून येणाऱ्या काही वाहनांना ब्रेक न लागल्याने किंवा अंदाज न आल्याने ती वाहने थेट पलटी झालेल्या टँकरवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेमुळे टँकरचा प्रचंड स्फोट झाला.

टँकरचा स्फोट झाल्यानंतर सांडलेल्या डिझेलमुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. डिझेल रस्त्यावर पसरल्याने आग वेगाने भडकली आणि दूरपर्यंत आगीचे लोळ दिसू लागले. जणू काही रस्त्यावर आगीची नदीच वाहत असल्याचे दृश्य घाटात पाहायला मिळत होते. या भीषण आगीमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×