घरकाम करणाऱ्या महिलांकडून २० लाखांचे दागिने चोरी

हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी

तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरकाम करणाऱ्या महिलांनी ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सॅलिसबरी पार्क भागात घडली. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६१ वर्षीय डाॅक्टर महिला कोंढव्यातील उंड्री भागात राहायला आहेत. त्यांची आई सॅलिसबरी पार्क भागातील गिडनी पार्क येथे राहायला आहे. त्यांच्या आईच्या घरात तीन महिला कामाला होत्या. त्यांच्या आईचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. घरकाम करणाऱ्या महिलांनी दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×