Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत

धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत

नांदेड सिटी पोलिसांनी गुंडाला केली अटक

marathinews24.com

पुणे – सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. गुंडाने कोयता उगारून नागरिकांना धमकावले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी गुंडाला अटक केली.

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून २ लाखांच्या बांगड्या चोरीला – सविस्तर बातमी 

ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते (वय २२, रा. पारी कंपनी चौक, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रथमेश गुरव यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपुते याला शहर आणि जिल्ह्यातून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. आदेशाचा भंग करुन तो धायरी भागात आला. शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास त्याने धायरीतील मारुती मंदिर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजविली. सातपुते याने कोयता उगारुन नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपुते याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×