Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून २ लाखांच्या बांगड्या चोरीला

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

अलंकार पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून दोन लाख रुपयांच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार एरंडवणे भागात उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेपाळी रखवालदाराच्या घरातून ३ लाखांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला एरंडवणे भागातील अर्चनानगर सोसायटीत राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेने शयनगृहातील टेबलावर दोन लाख रुपयांच्या साेन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या. चोरट्यांनी दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीत कामानिमित्त येणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करत आहेत.

धनकवडीत सदनिकेतून दागिने लांबविले

धनकवडी भागातील सोसायटीत असलेल्या सदनिकेतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीतील चैतन्यनगर सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सदनिकेतून दोन लाख एक हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×