Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

नेपाळी रखवालदाराच्या घरातून ३ लाखांचे दागिने लांबविले

नेपाळी रखवालदाराच्या घरातून ३ लाखांचे दागिने लांबविले

सोमवार पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीत रखवालदार म्हणून काम करणाऱ्या एकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवार पेठेत घडली. याबाबत रखवालदार अंकित धोजबहादुर कुंदर (वय २७) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर भागात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदर कुटुंबीय मूळचे नेपाळचे आहे. सोमवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपाजवळ असलेल्या श्री महालक्ष्मी सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. सोसायटीच्या तळमजल्यावर त्यांचे घर आहे. सोसायटीच्या आवारात श्री महालक्ष्मी मंदिर आहे. आवारात भाविकांची वर्दळ असते. १ डिसेंबर रोजी कुंदुर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप ताेडले. कपाटातून दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×