Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हडपसर भागात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठांचा मृत्यू

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसरमध्ये अवजड वाहनांच्या धडकेत दोन ज्येष्ठांचा बळी

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागात वेगवेगळ्या अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला, तसेच ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हडपसरमधील गाडीतळ भागात रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली. गजानन दशरथ तावरे (वय ६३, रा. आंबेबुद्रुक, मोरगाव, ता. बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक रंगय्या गौडा (वय २६, रा. कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत तावरे यांचा मुलगा परेश यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन तावरे हे शनिवारी (१३ डिसेंबर) रात्री बाराच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ परिसरातून निघाले होते. रस्ता ओलांडणाऱ्या तावरे यांना कंटेनरने धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.

रखवालदाराच्या घरातून तीन लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

हडपसरमधील मांजरी बुद्रुक भागात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अनंत यकाप्पा विभुते (वय ७६, रा. मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुजाता सोंटले (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनंत विभुते हे शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मांजरीतील घुले वस्ती परिसरातून निघाले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार विभुते यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विभुते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×