Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

रखवालदाराच्या घरातून तीन लाखांचे दागिने लंपास

कोंढव्यात दूरसंचार विभागाची केबल चोरी

सोमवार पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीत रखवालदार म्हणून काम करणाऱ्या एकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवार पेठेत घडली. रखवालदार अंकित धोजबहादुर कुंदर (वय २७) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमान प्रवासी संगणक अभियंत्याकडे गांजा सापडला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदर कुटुंबीय सोमवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपाजवळ असलेल्या श्री महालक्ष्मी सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. सोसायटीच्या तळमजल्यावर त्यांचे घर आहे. सोसायटीच्या आवारात श्री महालक्ष्मी मंदिर आहे. आवारात भाविकांची वर्दळ असते. १ डिसेंबर रोजी कुंदुर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप ताेडले. कपाटातून दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×