Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

विमान प्रवासी संगणक अभियंत्याकडे गांजा सापडला

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – विमान प्रवासी संगणक अभियंत्याच्या पिशवीत गांजा सापडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संगणक अभियंता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय संगणक अभियंता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे. तो खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. तो खराडी भागातील एका सोसायटी राहायला आहे.

हडपसरमध्ये हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता ११ डिसेंबर रोजी विमानाने उत्तर प्रदेशात निघाला हाेता. देशातंर्गत विमान प्रवासात सामानाची तपासणी होत नसल्याचा समज त्याचा होता. विमानात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या पिशवीत लाईटर सापडले. लाईटर काढत असताना पिशवीतून दोन प्लास्टिक पिशव्या पडल्या. छोट्या प्लास्टिक पिशवीत गांजा असल्याचे तपासणीत उघडकीस आले. पिशवीतील गांजाचे वजन करण्यात आले. तेव्हा दोन पिशव्यात १२ ग्रॅम गांजा सापडला. विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेल्या महिलेकडून ७२ लाख २० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. चिप्सच्या डब्यातून हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा प्रकार सीमाशुल्क विभागाने (कस्टम) नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला कस्टमने नुकतेच पकडले. प्रवाशाकडून २ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. बँकाॅकहून पुणे विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाने त्याच्याकडील सामानात गांजा लपविला होता. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात नियंत्रित वातावरणात लागवड करण्यात आलेल्या गांजाची किंमत मोठी असते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×