स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरण
Marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून बसमध्ये तुलनात्मक ध्वनी पडताळणी ही महत्वाची चाचणी करण्यात आली. त्यादृष्टीने आरोपी दत्तात्रय गाडे याला गुन्ह्यात शिक्षा होण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांनी सांगितले.
नराधम दत्तात्रय गाडे यांच्याविरोधात ८९३ पानांचे दोषारोपपत्र दाखल – सविस्तर बातमी
तरुणीवर बलात्कार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यादृष्टीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसमध्ये जाऊन तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी केली आहे. ही चाचणी बसमध्ये अत्याचार झाली, त्याच सकाळच्या वेळी करण्यात आली आहे. मुलीवर ज्यावेळी अत्याचार झाला, त्यावेळी ती ओरडली होती. मात्र, तिचा आवाज बाहेर कोणालाही ऐकू आला नाही. चाचणीत ज्या अंतरावर लोक बसले होते त्याठिकाणी मायक्रोफोन लावण्यात आले होते. त्यातच महिलेला बसमधून ओरडण्यास सांगितले . मात्र या चाचणीत बाहेरच्या सकाळच्या आवाजात गाडीतून बाहेर पडलेला आवाज अत्यंत कमी डेसीबलने बाहेर आला. त्यामुळे तो आवाज बाहेरच्या गोंगाटात ऐकूच आला नसल्याची स्पष्ठता चाचणीत करण्यात आली.
आरोपी गाडीने सर्च केलेल्या गुगल साईटची तपासणी
पोलिसांना दिलेल्या माहितीत गाडे याने समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे म्हटले होते. त्याचाच धागा पकडून पोलिसांनी गाडेची गुगल सर्च टेस्ट घेतली. त्याने गुगलवर नेमके काय सर्च केले याची माहिती घेतली असता, त्याने महिलांचे पॉर्न व्हिडीओ सर्च केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने जे व्हिडीओ पाहिले ते व्हिडीओ महिलांशी संबंधीत होते. ते व्हिडीओ समलैंगिक संबंधाशी संबधीत नव्हते, असेही गुगलसर्च टेस्ट मधून समोर आले आहे. पुराव्यांमध्ये आरोपीचा डीएनए जुळला आहे.
त्या बसमध्ये दोघांचेही केस सापडले
आरोपी गाडे याच्या शर्टाचे बटनही पोलिसांना बसमध्ये सापडले आहे. गुन्हा करताना घातलेला शर्टही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात एसटी महामंडळ कर्मचारी, कॅब चालक, रिक्षा चालक त्याबरोबरच वैद्यकीय अहवाल त्याबरोबरच ओळख परेड हे महत्वाचे पुरावे आरोप पत्रासोबत लावण्यात आले आहे. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचीही परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे. दरम्यान, आरोपी तपासात पुर्णपणे सहकार्य नाही. तो सराईत आणि निर्ढावलेला असल्याने त्याने पोलिसांना पुर्णपणे सहकार्य केले नाही. विस्तीर्ण उसाच्या पट्ट्यातून शोूधन काढणेही जिकीरीचे होते. पंच आणि साक्षीदारांची साक्ष निर्भयपणे नोंदवून घेणे हे देखील महत्वाचे होते. हे दोषारोपपत्रमध्ये नमूद केले आहे.