एमबीबीएस प्रवेशाच्या बहाण्याने सव्वा कोटींचा गंडा

एमबीबीएस प्रवेशाच्या बहाण्याने सव्वा कोटींचा गंडा

चद्रपुरच्या व्यावसायिकाला गंडा, बाणेर ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करीत एकाल तब्बल १ कोटी २६ लाखांचा गंडा घातला आहे. जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलसह इतर ठिकाणी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे. याप्रकरणी राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या यांच्यावर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रविण किशोर हलकरे (वय ५२, रा. रामनगर, चंद्रपुर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

रेल्वेतून उतरताना केला मदतीचा बहाणा; ४० लाखांचे दागिने चोरणार्‍या टोळीला अटक – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हलकरे हे मुळचे चंद्रपुर येथील असून त्यांचा टिव्ही आणि संगणक विक्रीचा व्यवसाय आहे. दि. १ नोव्हेंबरला त्यांनी फेसबुकवर एमबीएसमे प्रवेश दिला जाईल अशा आशयाची जाहिरात वाचली. मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा असयाने त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर फोन केला. त्यावेळी राजेश गुप्ता याने त्यांना बाणेर येथील तेजस इटरनिटी, बालेवाडी फाटा येण्यास सांगितले. मुलीच्या अ‍ॅडमीशनसाठी गेले असता आरोपी गुप्ता आणि ब्रिजेश आर्या यांना ते भेटले. जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पीटमध्ये अ‍ॅडमीशन करून देतो असे सांगितले. डोनेशनसाठी ३५ लाख रूपये लागतीले असे सांगितले.

मुलीचे अ‍ॅडमीशन एमबीबीएसला होईल या आशेने तक्रारदार हलकरे यांनी ३ लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर त्यांना लेटरहेडसह तयार केलेले पत्र मिळाले. त्यांना जळगावमधून पुन्हा ७ सात लाख रूपये घेऊन असे सांगण्यात आले. आरोपींनी जळगावच्या मेडीकल कॉलेजचा फॉर्म सोबत आणला. त्यावर मुलीची सही घेत तिचा फोटो लावला. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडून तब्ब्ल १ कोटी २६ लाख उकळले. तसेच एमबीबीएसला अ‍ॅडमीशन न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×