गाडी पार्किंगच्या वादातून केला वार, कुटूंबियांनाही मारहाण

बाप-लेकाला अटक

marathinews24.com

पुणे – गाडी पार्किंगच्या वादातून टोळक्याने कुटूंबियाला बेदम मारहाण करीत एकावर वार केल्याची घटना १४ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये घडली आहे. आंबेगाव पोलिसांनी टोळक्याला अटक केली आहे.

शिवाजीनगर मध्ये मेडिकल दुकानात चोरी – सविस्तर बातमी

मधुकर साधुजी भगत (वय ५२ रा. कात्रज) वैभव मधुकर भगत (वय २४ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. ४७ वर्षीय जखमी झालेल्या नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमध्ये राहायला असून, १४ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरातील गल्ली क्रमांक आठमध्ये गाडी पार्किंग करत होते. त्यावेळी त्यांची आरोपींसोबत बाचाबाची झाली. त्याच रागातून आरोपींनी तक्रारदारावर लोखंडी हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्‍या तक्रारदाराच्या मुलासह पत्नीलाही धक्काबुक्की करीत दमदाटी केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×