वारजेतील न्यू अहिरेगावात चोरी, ३२ लाखांचा ऐवज चोरीला

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या

चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – राहत्या घराच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल ३२ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मुलीच्या छेडछाडीवरून टोळक्याकडून दोघांना मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे न्यू अहिरे गावात राहायला आहेत. १ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत त्यांच्या राहत्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील स्टीलच्या टाकीत ठेवलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३२ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदाराला ऐवज चोरीची माहिती झाल्यानंतर त्यांनी तातडीने वारजे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×