२ गावठी पिस्तूल, ४ काडतुसे जप्त
Marathinews24.com
पुणे – सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २ गावठी पिस्तूलांसह ४ जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अजिम ऊर्फ आंटया मोहम्मद हुसेन शेख (वय २५ रा. सय्यदनगर, हडपसर, महंदवाडी असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यातंर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
बहिणीची छेड काढलेल्या कारणावरून तरुणाचा खून – सविस्तर बातमी
विविध सण-उत्सवाच्या अनुषंगाने काळेपडळ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार नासीर देशमुख यांना सराईत गुन्हेगार अजिम ऊर्फ आंटया मोहम्मद हुसेन शेख हा हेवणपार्ककडे जाणार्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस, महंदवाडीत थांबल्याची माहिती मिळाली. तो गुन्हा करण्याच्या उद्येशाने स्वतःच्या कब्जात अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता असल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक अमित शेट यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार तपास पथक महंदवाडी परिसरात आरोपीच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांना पाहून सराईत अजित उर्फ आंट्या अतिशय घाबरलेल्या अवस्थेत मार्ग शोधू लागला.
तपास पथकाने त्याला घेरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ पिस्टल आणि ४ जिवंत राउंड असा ८१ हजार ६०० रूपयांचा शस्त्रसाठा मिळून आला. त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय अमित शेटे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, युवराज दुधाळ, प्रविण काळभोर, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, नासीर देशमुख, नितीन ढोले यांनी केली.