Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपास

एटीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न

Marathinews24.com

पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १५ ते १७ एप्रिलला हडपसरमधील मांजरी बुद्रूक परिसरात घडली आहे. चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी वैशाली रमेश देवकुळे (वय ४०, रा. लटके वडापाव दुकानाजवळ, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 62 लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार देवकुळे यांचे घर १५ ते १७ एप्रिलला बंद होते. नेमकी संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी देवकुळे बाहेरगावाहून माघारी आल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार शिंगाडे तपास करत आहेत.

मांजरी भागातील एटीएमची तोडफोड; रोकड चोरण्याचा प्रयत्न

बँकेच्या एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना मांजरी भागातील बेल्हेकर वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी हर्षद सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, मांजरीतील बेल्हेकर वस्तीसह संबंधित परिसरातील दोन एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×